Posts

!! How to handle “Your Services Are NO Longer Required” Situation!!

!! How to handle “Your Services Are NO Longer Required” Situation!! नोकरी असताना, जाताना, गेल्यावर आणि परत मिळाल्यावर ! ! सध्या आपण सर्वच जण अतिशय अनिश्चित आणि कठीण काळ अनुभवतोय. कदाचित महायुद्धानंतर प्रथमच अशी परिस्थिती आली असावी. काही दुर्दैवी लोकांच्या नोकऱ्या आधीच गेल्या आहेत, काहींना त्यांच्या मालकांनी, कंपनीने लवकरात लवकर दुसरी नोकरी शोधायला सांगितले आहे, आणि बाकीच्यांच्या अनेकांच्या सुरु असलेल्या नोकऱ्या आज जातील का उद्या जातील अशा अनिश्चित अवस्थेत आहेत. सुखासुखी सुरु असलेली नोकरी जाणे हा एक अतिशय वेदनादायी धक्कादायक अनुभव असतो. पुढचे अनेक जीवनशैली संबंधित ,कर्जासंबंधित आणि अपरिहार्य खर्च आ वासून पुढे उभे असतात. आणि दुर्दैवाने अशातच घरातील कोणाचे रुग्णालयीकरण (हॉस्पिटॅलिझशन) झाले तर मग काही विचारायलाच नको ! तर आपण दुर्दैवाने अशा परिस्थितीत सापडलोच तर त्यातल्या त्यात उत्तम काय करता येईल का ते आज पाहू. नोकरी जाताना !  जेव्हा कंपनीतील HR तुम्हास बोलवून सांगते की "Your services are no more required", मग आपल्याला मानसिक धक्का बसणे साहजिकच आहे. तिथे तुम्हास वाईट वाटले, रडाव